राज्यसभेत चालला देवेंद्र पॅटर्न; हा विजय लक्ष्मण भाऊ जगतापांना समर्पित – देवेंद्र फडणवीस
लोकवार्ता : राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या मतदानात भाजपने बाजी मारली आहे. विजय मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देताना म्हणतात, ”हा विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मी समर्पित करतो.” तसेच ‘भाजपचा विजय चंद्रकांत दादांच्या वाढदिवसाची भेट आहे’ असंही ते म्हणाले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची पुरेशी मतं असताना त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता या सर्व खेळीचे श्रेय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे.

महाडिकांच्या विजयांनंतर ‘निवडणूक केवळ लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सुरवातीला संजय पवारांचे पारडे जड असताना धनंजय महाडिकांनी शेवटी बाजी मारली. महाडिकांनी ४१.५ मत मिळाली तर संजय राऊत यांना ४१ मत मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीची १० मत फुटली. त्यामुळे धनंजय महाडिकांना विजय मिळाला. अखेर देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहून त्यांचा पॅटर्न दाखवला.