लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार?

लोकवार्ता: देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार असल्याचं सांगितलं जातंय. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्राचं सगळी राजकीय गणितं बदललं. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीच काय तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला. दरम्यान नवं सरकार कसं असेल? कुणाला मंत्रिपद मिळेल याबाबत चर्चा सुरु असतानाच सूत्रांकडून एक महत्त्वाची बातमी हाती आलीये. देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार आहे. भाजपकडून आजच सत्तास्थापनेचा केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे. सागर बंगल्यावर यासंदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार असून चंद्रकांत पाटील, गिरीज्ञ महाजन, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष लार हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं कळतंय.

या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट आहे. “भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”,असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे. मंत्रिपदं, खातेवाटप आणि भाजपसोबतची चर्चा याविषयी एकनाथ शिंदे यांनी असं ट्विट केलं आहे. “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani