“चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत..”
नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. याच वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय.
पिंपरी। लोकवार्ता-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर भाजपावर सडकून टीका केली. यावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं. याच वक्तव्याला आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. ते बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, “चंद्रकांत पाटलांना अशी भाषा शोभत नाही. चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत किंवा भाजपाच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नाहीत. ज्यांनी त्यांनी आपली मर्यादा ठेवून बोलायला पाहिजे.
चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. शाहरुख खानच्या मुलाला जामीन मिळत नाही, एक बर झालं हायकोर्टावर यांचा संशय नाही. नाहीतर ते म्हणाले असते हायकोर्ट देखील यांनी मॅनेज केलं. पाळंमुळं काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही.”