भाऊ तुमच्यामुळे मी खासदार झालो – धनंजय महाडिक
लोकवार्ता : भाऊ तुमच्यामुळे मी खासदार झालो असं म्हणतं नवनियुक्त खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट घेतली. खासदार महाडिक यांनी विजयानंतर पिंपळे गुरव येथील आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा निवास्थानी जाऊन आभार व्यक्त केले.
यावेळी नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ” भाऊ तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना नवीन प्रेरणा देणारी आहे. हा विजय खऱ्या अर्थाने तुमच्यामुळे आहे.

तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवड मधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकर जोमाने काम सुरु करा. आपल्याला पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे.” अशा भावना धनंजय महाडिकांनी व्यक्त केल्या.
त्याचवेळी खासदार म्ह्णून निवडून आल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी महाडिकांचे अभिनंदण केले.