पुण्यातील एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे रखडलेली दस्त नोंदणी सुरू
पुण्यातील एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे रखडलेली दस्त नोंदणी सुरू

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : कोरोना परिस्थितीमूळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात स्टॅम्प ड्युटी म्हणजेच दस्त नोंदणी देखील बंद राहिली होती. त्यामुळे निश्चित कालावधीत दस्तांची नोंदणी झाली नाही. मात्र, आज २६ जूनपासून ही दस्त नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती १ हजार रुपये इतकी निश्चित करण्याबाबतचे शासनाचे निर्देश देण्यात आले आहेत. पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. पं. पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या निर्णयामुळे नोंद न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम २७ च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील ३६ (४) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर जानेवारी २०२१ मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती १ हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली.या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-२/ दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये आज २६ जून या शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-२ / दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात आली होती.