“भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे यांना मातृशोक”
पिंपरी |लोकवार्ता –
भारतीय जनता पार्टी चे वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे यांच्या आई श्रीमती लक्ष्मीबाई नारायण मोढवे यांचे वृद्धपण काळाने निधन झाले आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई नारायण मोढवे-पाटील यांच्या घरात पाच मुले असून त्यांनी त्यांचा अतिशय कष्टाने सांभाळ केला .अलीकडेच त्यांनी नवीन वास्तूचे निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने मोढवे-पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पाठीमागे पाच मुले, सून नातवडे आणि भाऊबंद नातेवाईक, असा मोठा परिवार आहे. अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वाजता सिनानदी तीरावर होणार आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा महेश लांडगे तसेच माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्व. लक्ष्मीबाई मोढवे-पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.