पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जाधववाडीत १ हजार ३५०आयुष्मान भारत कार्डचे वितरण
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते वितरण

लोकवार्ता । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते जाधववाडी प्रभाग क्रमांक दोनमधील तब्बल १ हजार ३५० नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध लोकउपयोगी योजना बाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली पुढे बोलताना श्री लांडगे म्हणाले कि स्वतन्त्र भारताच्या ७५ वर्षामध्ये पहिल्यांदाच जनतेला आपण दिलेलं मत हे योग्ये व्यक्तीला दिले आहे असा विश्वास जनते मध्ये निर्माण झाला आहे यावेळी राहुल जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी श्री विजु फुगे, कविता हिंगे, नीलेश बोराटे, संगीता भोसले, सोनम जांभूळकर, अभिजीत गाडे, रोहित तळेकर, किशोर भुजबळ, राजेश जाधव, नंदकुमार जाधव, पप्पूजाधव, रवींद्र जांभूळकर, प्रताप भांबे, महेंद्र मंडलिक, चिंतामणी शिंदे, खंडू वाळुजकर मारुती जांभुळकर इ. मान्यवर व लाभार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.