अलंकापुरीत हनुमान चालिसांचे मनसे तर्फे वाटप
अन्नपूर्णा माता नगर मधील महंत श्री गणेशानंद महाराज पुणेकर यांचा पुढाकार.
आळंदी । लोकवार्ता-
श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त येथील अन्नपूर्णा माता नगर मधील महंत श्री गणेशानंद महाराज पुणेकर संचलित अनाथ बालकाश्रमात श्री हनुमान चालीसा वाटप करण्यात आल्या.
हनुमान चालीसा वाटपापूर्वी श्री हनुमान चालिसा पठण व वाचन उत्साहात झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्ते आस्थापना व साधन सुविधा विभागाचे आळंदी शहराध्यक्ष किरण नरके यांच्या वतीने १११ हनुमान चालीसा चे वाटप महंत गणेशानंद महाराज पुणेकर यांचेसह उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर,नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, सामाजिक कार्यकर्ते सदिप रंधवे, अतुल रंधवे, ज्ञानेश्वर शेटे, गणेश पाठक, भारती मोरे, गणेश काकडे, पांडुरंग लेंडघर, वैभव रकसाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप रंधवे यांनी संविधानाचे वाचन व जनजागृती करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे सांगितले. भागवत काटकर यांनी तसेच गणेश महाराज पुणेकर यांनी आश्रमातील माहिती देत मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकीतून उपक्रम या ठिकाणी घेवून अनाथ मुलांचे पालन पोषण करण्यासाठी समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.