दिवाळी बम्पर ऑफर ,”खड्डेमुक्त रस्ते दाखवा आणि मिळवा चक्क पाच हजार रुपये”!
पिंपरी | २१ ऑक्टोबर लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असून निवडणुकांची जोरदार तय्यारी देखील सुरु झाली आहे .यातच दिवाळी डोळ्यासमोर ठेवून चक्क दिवाळी बंपर ऑफर असे बॅनर पुनावळे-ताथवडे भागात झळकत असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच बॅनर मुळे पुनावळे ताथवडे परिसरातील राजकारण खूपच तापलेले दिसत आहेत. . प्रभाग 25 मध्ये येणाऱ्या पुनावळे-ताथवडे परिसरातील रस्त्यावरील खांबावर रात्रीतच बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर ‘दिवाळी बंपर ऑफर, खडेमुक्त रस्ते दाखवा आणि पाच हजार रुपये मिळवा…फक्त आणि फक्त’ असे लिहले आहे. यातील “फक्त आणि फक्त” या ‘टँग लाईन’ची परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे..

पुनावळे-ताथवडे परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या परिसरातील रस्त्यांवरून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हे बॅनर झळकले आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुका आल्याने परिसरातील विकास कामे, प्रश्नांकडे लक्ष नेण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी याच प्रभागात वाकड परिसरात ‘मी रस्ता बोलतोय…’ असेही बॅनर लागले होते. शहराच्या राजकारणात प्रभाग 25 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.

स्थानिकांनी वारंवार विनवण्या करूनही काम न झाल्याचे दिसून आले आहे.पुनावळे परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. याबाबत वारंवार पदाधिकारी, प्रशासन यांना पत्र व्यवहार केला असून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. नागरी प्रश्नांकडे स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत भाजपचे पदाधिकारी नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10952&action