लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दिवाळीनिमित्त दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आयोजित.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी फेस्टिवलचे आयोजन केले आहे.-ॲड. नितीन लांडगे.

पिंपरी। लोकवार्ता-

स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दिवाळीनिमित्त दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन गुरुवारी (दि. 28 ऑक्टोबर) भाजपचे आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. नितीन लांडगे, ज्येष्ठ नगरसेविका भीमाताई फुगे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा सोनाली गव्हाणे, नगरसेवक विकास डोळस, सागर गवळी, सामाजिक कार्यकर्ते विजय फुगे, निवृत्ती फुगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ समन्वयक अर्चना क्षिरसागर, क्षेत्रिय समन्वयक सुजाता परदेशी तसेच सुदर्शना पाटील, पल्लवी गुळवे, अहिल्या साळुंखे, निशा निमसे, जयश्री ढोले आदी उपस्थित होते.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मिशन स्वावलंबन प्रकल्पातील भोसरीतील 33 बचत गटांसाठी दिवाळीनिमित्त स्टॉल उभारण्यात आले आहेत. या फेस्टिवलमध्ये दिवाळीनिमित्त लागणारे सर्व साहित्य तसेच बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक वस्तूंना बाजारपेठ मिळून देण्याच्या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात फॅशन वेअर, ज्वेलरी, पॅक फुड, मसाले, पापड, लोणची, बॅग्स, गिफ्ट आर्टिकल्स, दिवाळीसाठी लागणारे आकर्षक पणत्या, आकाश कंदिल, मातीची भांडी, दिवाळी फराळ आदीं वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले आहे.

यावेळी ॲड. नितीन लांडगे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध प्रकल्प आणि योजना राबवित असते. यामध्ये महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी फेस्टिवलचे आयोजन केले आहे. आता महिला बचत गटांनी देखिल पारंपारिक व्यवसायांऐवजी नविन आणि आधुनिक उद्योग कौशल्य मिळवून त्यातून आर्थिक विकास साध्य करावा. एखाद्या कुटूंबातील महिला आर्थिक सक्षम झाली तर पुर्ण कुटूंब सक्षम होईल. तसेच त्यांचा आर्थिकस्तर देखिल उंचावेल. महिला सक्षमीकरणासाठी महानगरापालिकेच्या वतीने सुरु असणा-या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असेही आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani