यंदा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बैलजोडीचा मान वरखडे कुटुंबाला
लोकवार्ता
आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीचा मान यंदा आळंदीचे प्रगतिशील शेतकरी पांडुरंग वरखडे यांना मिळाला आहे.
गेली दोन वर्षे कोरोना मुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या गर्दीत होत होता. मात्र यंदा पालखी सोहळा मोठ्या संख्येने होणार आहे. यावर्षी पालखी पायी जाणार आहे. २१ जून ला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बैलजोडी समितीच्या सभेत एकमताने आळंदीतील पांडुरंग वरखडे यांच्या कुटुंबाला पालखी सोहळ्याच्या बैलजोडीचा मान मिळाला आहे.
यावेळी बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, अभय टिळक, सदस्य शिवाजीराव रानवडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.