घाबरून जाऊ नका , काळजी घ्या !
-ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे नागरिकांना आवाहन
पिंपरी ।लोकवार्ता-
भारतामध्ये नवीन कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोन चा शिरकाव झालेला आहे या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता सवतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यायचे आवाहन भाजप आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवाडकरांना केली.

भारतात जवळपास चौदाहुन अधिक रुग्ण भेटल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. भारतात १४ रुग्ण असून फक्त महाराष्ट्रात १० रुग्ण आढळले आहे.पिंपरी चिंचवड मध्ये एकाच परिवारातील ६ जणांना ओमायक्रोन ची लागण झाल्याचे समोर आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना पिंपरी चिंचवड च्या रुग्णालयात दाखल केले आहे. पिंपरी मधील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलॆल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन आमदार लांडगे यांनी नागरिकांना केले.
सर्व नागरिकांनी आपले दोनही लसीकरण करून घ्यावे, जरी लसीकरण झाले असेल तरीही मास्क चा आणि सॅनिटायजर चा वापर करावा. बाहेर जाताना सोशल डिस्टन्स पाळावा असे आवाहन देखील महेश लांडगे यांनी केले.