लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुणेकरांना आवाहन; पुन्हा कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका…

निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली

लोकवार्ता।प्रतिनिधी

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं.

पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण कोरोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani