लांडेवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, लांडेवाडी येथील तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित असणारी अशी जयंती साजरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त वेळोवेळी होणाऱ्या बँड बाजा, DJ, अथवा मिरवणूक व खर्चिक स्वरूपात असणारे मोठे मोठे डेकोरेशन यांसारखा अनावश्यक खर्च टाळून दि. १४ एप्रिल रोजी स्थानिक ठिकाणी “भीमजयंती महोत्सव लांडेवाडी वसाहत”या कमिटीने गरजू विद्यार्थी वर्गाला एकत्र करून तब्बल 300 विद्यार्थ्यांना वहीपेनाचे वाटप केले, तसेच कमीत कमी 2000 लोकांना अन्नदानाचे वाटप केले आहे. व दि. १७ एप्रिल २०२३ रोजी श्री स्वामी समर्थ विद्यालय लांडेवीडी येथे ईयत्ता १० वी च्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य कंपासपेठी चे वाटप करण्यात आले. प्रामुख्याने अशा जयंती उत्सवाचा होणारा खर्च भिमजयंती महोत्सव लांडेवाडी कमिटीने स्वखर्चातून करत हा आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे.

या उत्सवात दीपक कसबे, मयूर गायकवाड, रोहित हुके, महेश रोकडे, स्वप्नील जौंजाळ, क्षितिज पवार, श्री स्वामी समर्थ विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग व मंडळाचे इतर सर्व सभासद सहभागी झाले.
या उपक्रमाबाबत लांडेवाडी, भोसरी व पिंपरी परिसरातून तरुणांबद्दल कौतुक व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर दरवर्षी अशाच आगळ्या वेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांनी महापुरुषांना मानवंदना देणार असल्याचे आयोजक तरुणांनी सांगितले.