डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील ४८ संशोधकांना मानांकन
वर्ल्ड सायन्टिस्ट अॅन्ड युनिर्व्हसिटी रँकींग २०२१

लोकवार्ता।प्रतिनिधी
वर्ल्ड सायन्टिस्ट अॅन्ड युनिर्व्हसिटी रँकींग २०२१ या जागतिक स्पर्धेमध्ये पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांना भूशास्त्र या विषयात, संशोधन संचालक डॉ. रमेश भोंडे, कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर यांच्यासह ४८ संशोधकांना मानांकन मिळाले आहे. नॅक ‘अ’ पाठोपाठ विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.

अमेरिकेच्या मिशीगण विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिंहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर – डॉजर सायंटिफिक इंडेक्स तथा ए. डी. सायंटिफिक इंडेक्स विश्लेषीत केलेला आहे. जगभरातील १८१ देशांतील १० हजार ६६५ विद्यापीठातील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांमधून केलेल्या निवडीतून ‘वर्ल्ड सायटिस्ट अँड युनिर्व्हसिटी रँकिंग जाहिर झाले आहे.
जागतिक स्तरावरील क्रमवारीत पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील संशोधकांनी स्थान पटकाविले आहे. मेडीकल सायन्समध्ये ४१ संशोधकांना, बायोटेक्नॉलॉजी आणि आयुर्वेदात ३ संशोधकांना, अर्थ सायन्समध्ये दोघांना स्थान मिळाले आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्रकुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी यशस्वी संशोधकांचे कौतुक केले आहे.
विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे,
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे: विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार, कुलसचिव डॉ. ए. एन सूर्यकर, संशोधन संचालक डॉ. रमेश भोंडे, डॉ. सारिका चर्तुवेदी.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे :
डॉ. अमरजित सिंग – सीईओ अँड प्रिन्सिपल डायरेक्टर, डॉ. ए. एल. काकराणी – डायरेक्टर इंटरनॅशनल कोलॅबोरेशनस्, डॉ. श्रीकांत त्रिपाठी – डायरेक्टर मेडिकल रिसर्च, डॉ. जे. एस. भवाळकर – अधिष्ठाता, डॉ. सचिन अत्रे, डॉ. अमितव बॅनर्जी, डॉ. सविता जाधव, डॉ. डॅनियल सलढाना, डॉ. रविंद्र जैन, डॉ. युगल शर्मा, डॉ. द्वारकानाथ रंगनाथन, डॉ. एम. एम. बार्थवाल, डॉ. अर्चना सिंग, डॉ. एस. एल. जाधव, डॉ. शिरिष चंदनवाले, डॉ. शरद अगरखेडकर, डॉ. सुनिता बामनीकर, डॉ. अतुल जाधव, डॉ. सी. श्रीदेवी, डॉ. नागेश्वरी गंधम, डॉ. जनक रंगनाथन, डॉ. जी. डी. महाजन, डॉ. नीता गोखले, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. शुभांशू गुप्ता, डॉ. परिक्षित गोगाटे, डॉ. कारोल ब्लासोफ, डॉ. बिश्रा खान, डॉ. विपुल शर्मा.
डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, पिंपरी, पुणे: डॉ. सचिन सरोदे, डॉ. सुप्रिया खेऊर, डॉ. गारगी सरोदे, डॉ. सहाना हेगडे, डॉ. अनमोल माथूर, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. अनिशा आचार्य, डॉ. राहुल कटारिया. डॉ. डी. वाय. पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉरमॅटिक्स संस्था, ताथवडे, पुणे: डॉ. जे. के. पॉल – डायरेक्टर, डॉ. निलेशकुमार शर्मा, डॉ. स्वप्निल गायकवाड, डॉ. ज्योती देशपांडे.
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे: वैद्य आरती शिंदे, वैद्य अभिजीत शेखर, वैद्य निलीमा अमृते.