लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

वाकड येथील पर्यावरणपूरक विसर्जन हौदात 3000 पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन | प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लोकवार्ता : पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन करण्यासाठी वाकड येथील द्रौपदा मंगल कार्यालयाजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी उभारलेल्या पर्यावरण पूरक विसर्जन हौदात तब्बल ३००० पेक्षा अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

वाकड

गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्तींचे वाढलेले प्रमाण पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे. त्याच अनुषंगाने नदी, नाले, ओढे प्रदूषित होऊ नयेत पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशाने या विसर्जन हौदाची निर्मिती करण्यात आली होती.

एक चायवाला ते कोण बनेगा करोडपती (video)

शहरातील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मोठ्या उत्साहाने या विसर्जन हौदात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात केली. विसर्जन घाट परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती. आठ स्वयंसेवकांच्या देखरेखीत गणेश विसर्जन आणि मुर्तीदान करण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली होती. निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश उभारले होते. येथील विसर्जित मूर्ती श्री फाउंडेशन या संस्थेकडे सुपूर्द केल्या जातील आणि त्या रिसायकल करून पुढील वर्षी अल्प किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतील. यातून येणारा निधी अनाथ आश्रमातील मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जातो.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘या’ वृक्षाखाली घेतली समाधी (video)

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ दादा पवार यांनी या विसर्जन घाटास भेट देऊन विशाल वाकडकर यांच्या स्तुत्य कामाचे कौतुक केले होते. शहरातील नागरिकांनी गणेश विसर्जन करण्यासाठी पर्यावरण पूरक हौदाचा उपयोग करून पर्यावरण रक्षण करण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असेही विशाल वाकडकर यांनी म्हटले आहे.

असा झाला वडापावचा जन्म…

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
10 फेमस ट्रेकिंग प्लेस | Best Trekking Place Near Pune महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काही खास फोटो गुलाबी वेशात सोनालीची अदाकारी | Sonalee Kulkarni प्राजक्ता माळीचा मराठमोळा लुक | Prajakta Mali Marathi Actor या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स