“राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय होणार या निवडणुका”
-राज्यात स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारीला निवडणुका होणार आहेत.
मुंबई।लोकवार्ता-
राज्यात स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारीला निवडणुका होणार आहेत. 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत.
- राज्यातील 106 नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या स्थगित केलेल्या जागांवर 18 जानेवारी रोजी मतदान
- या निवडणुकांची एकत्र मतमोजणी 19 जानेवारी रोजी
- राज्यातील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुका 21 डिसेंबरला रोजी जाहीर झाल्या होत्या
- या निवडणुकांमधील ओबीसींच्या आरक्षित जागांची स्थगिती निवडणूक आयोगाने दिली होती
- आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने स्थगिती केलेल्या जागा खुल्या करून त्यावर 18 जानेवारी रोजी निवडणुका घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, तर आज भाजपनेही या निवडणुका रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर केल्या असून त्या ओबीसी आरक्षणाशिवार होणार आहेत.