चिखलीतील विद्युत पुरवठा सकाळपासून खंडित; नागरिक त्रस्त
लोकवार्ता : चिखली येथील नेवाळे वस्ती व जाधववाडी भागात आज सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
सकाळी सोसायटी जवळील ट्रान्सफॉर्मरचा मोठा आवाज झाला व 4.३0 वा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सोसायटीला फ्लॅट्स ला पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विद्युत पुरवठा नसल्याने लोकांच्या दैनंदिन कामावर प्रभाव पडला. जाधववाडी मधील आमच्या सोसायटीमध्ये 250 फ्लॅट्स आहेत, असं श्रीप्रसाद राऊल, सचिव, देवराई हौसिंग सोसायटी यांनी सांगितल.
कपिल भदाणे, सचिव, शुभारंभ हौसिंग सोसायटी म्हणाले की, “विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने आम्हाला डिझेल जेनरेटर चा वापर करावा लागतो. काल आम्हाला 10,000 रुपये डिझेल वर खर्च करावा लागला. आज सकाळी 6.10 वा विद्युत पुरवठा खंडित झाला व 7.45 वा सुरळीत झाला.
संतोष कारले, खजिनदार, शुभारंभ हौसिंग सोसायटी म्हणाले की, “आमच्या सोसायटी मध्ये 186 फ्लॅट्स आहेत. आमच्या व इतर सोसायटी मध्ये राहणारे रहिवासी जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर त्रास होतो. कारण याचा परिणाम वाय -फाय सुविधेवर होतो.”
संजीवन सांगळे, चेअरमन, चिखली मोशी हौसिंग फेडरेशन म्हणाले की, “चिखली मधील नेवाळे वस्ती भागातील 4 ते 5 हौसिंग सोसायटींचा विद्युत पुरवठा आज साखळी खंडित झाला होता. त्यामुळे त्यामध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला.”