बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – प्रा. आल्हाट
लोकवार्ता : साठ एकर जागेवर उभे राहिलेले बारामतीचे टेक्स्टाईल पार्क देशातील सर्वोत्तम टेक्स्टाईल पार्कपैकी एक असून महिलांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण या ठिकाणी झाले आहे. महिलांना आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण बनविण्यासह त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचेही काम टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून झाले. ग्रामीण भागात असे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे मत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी व्यक्त केले.

बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कला पिंपरी चिंचवड परिसरातील महिलांनी भेट दिली. यावेळी महिलांनी येथील कामाची पाहणी केली अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी दिली.
पिंपरी चिंचवड परिसरातील ५० महिलांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कला भेट दिली. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेण्यात आली. याबद्दल माहिती देताना प्रा .आल्हाट म्हणाल्या, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीतील तीन हजारांवर महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला गेला आहे. 2007 मध्ये हा प्रकल्प सुरु झाल्यापासून या भागातील आर्थिक स्तर नक्कीच उंचावला आहे. 60 एकर जागेवर उभे राहिलेले बारामतीचे टेक्स्टाईल पार्क देशातील सर्वोत्तम टेक्स्टाईल पार्कपैकी एक असून महिलांचे ख-या अर्थाने सक्षमीकरण या ठिकाणी झाले आहे. महिलांना आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण बनविण्यासह त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचेही काम टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून झाले.
या ठिकाणी भेट दिल्यानंतर महिलांना नक्कीच प्रेरणा मिळाली असे आल्हाट म्हणाल्या.