लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पुणे कुणाच्या बापाचं नाही; छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा महाराष्ट्राचा शत्रू

पुणे कुणाच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार श्रीमंत कोकाटे यांनी मनसेला दिलाय.

लोकवार्ता । प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडमधील वाद आता अजून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सज्जड दम भरलाय. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु, असा इशारा वसंत मोरे यांनी दिलाय. मोरे यांच्या या इशाऱ्याला आता श्रीमंत कोकाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसेनं प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुणाच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे, असं जोरदार श्रीमंत कोकाटे यांनी मनसेला दिलाय. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी १३ जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावं, असा टोलाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.

प्रवीण गायकवाड यांनी केलेली टीका मनसेला चांगली झोंबल्याचं पाहायला मिळालं. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा दमच मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी गायकवाड यांना भरला आहे. वसंत मोरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा देतानाच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून तुम्ही इच्छुक होता. तेव्हा तुम्हाला मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना पाहिलंय. एवढेच काय मी प्रविण गायकवाड, असं स्वत:चं नाव लोकांना सांगत होतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani