लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद

-पिंपरी चिंचवडमध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला संतोष आणि मनोज यादव प्रथम क्रमांक

-खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे प्रथम क्रमांक

पिंपरी | लोकवार्ता-

 पिंपळे सौदागर येथे आयोजित केलेल्या “पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन” 21 कि. मी. स्पर्धेत शर्मिला संतोष आणि मनोज यादव यांनी प्रथम क्रमांक तर खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून रोख पारितोषिक पटकाविले. रविवारी (दि. 5 डिसेंबर) किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा. लि., नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन व उन्नती सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यशदा रियाल्टी ग्रुप यांच्या सहकार्याने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

बक्षिस वितरण प्रसंगी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, सुदृढ शरीर व सक्षम मन बनविण्यासाठी धावणे हा एक उत्तम व दर्जेदार व्यायाम आहे. केवळ खेळ म्हणून किंवा स्पर्धा म्हणून मॅरेथॉन नाही तर आपल्यातील सर्वांगीण बदलाची क्षमता धावण्यात आहे. आरोग्य, मानसिकता, स्वभाव, सवयी या साऱ्याच बाबींचा सकारात्मक सराव धावण्यामुळे होतो. ही एक सक्षम आणि सुरक्षित आरोग्य साखळी आहे. तरुण, तरुणींपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंत सर्वच वयोगटातील रनर्सचा या हाफ मॅरेथॉनमध्ये 2500 स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असलेले ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग आयोजकांचा उत्साह वाढविणारा होता.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे: 21 कि. मी. स्त्री गट : प्रथम क्रमांक : शर्मिला संतोष, व्दितीय क्रमांक : वेदांशी जोशी, तिसरा क्रमांक : अनुभूती चतुर्वेदी, पुरुष गटात : प्रथम क्रमांक : मनोज यादव, व्दितीय क्रमांक : अनुराग कोणकर, तिसरा क्रमांक : उडेसिंग सागंल्या पडवी, खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : गौरी सलिल गुमास्ते, व्दितीय क्रमांक : सजीनी रोशन, तिसरा क्रमांक : स्मिता कुलकर्णी, पुरुष गट : प्रथम क्रमांक : सुनिल शिवणे, व्दितीय क्रमांक : सावळेराव भिमा, तिसरा क्रमांक : सुरेश यादव ; 10 कि. मी. स्त्री गट : प्रथम क्रमांक : शिवानी चौरासिया, व्दितीय क्रमांक : बुध्द राम, तिसरा क्रमांक : समिक्षा खरे,

पुरुष गटात : प्रथम क्रमांक : मन्नु सिंग, व्दितीय क्रमांक : पाराजी गायकवाड, तिसरा क्रमांक : अनिल कोरवी,
खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : स्वाती अगरवाल, व्दितीय क्रमांक : प्रतिभा, तिसरा क्रमांक : प्रसन्नप्रिया रेड्डी,
पुरुष गट : प्रथम क्रमांक : दिपक ओचाणी, व्दितीय क्रमांक : अतुल गोडबोले, तिसरा क्रमांक : प्रसाद कुलकर्णी ; 5 कि. मी. स्त्री गट : प्रथम क्रमांक : गायत्री शिंदे, व्दितीय क्रमांक : वेदश्री विनोद, तिसरा क्रमांक : खुशबू बघेल,
पुरुष गटात : प्रथम क्रमांक : दत्तात्रय भोर, व्दितीय क्रमांक : ओमकार अनंत तिसरा क्रमांक : हरिराम चंदर, खुला गटात स्त्री : प्रथम क्रमांक : शिल्पी मंडल, व्दितीय क्रमांक : डॉ. मेघा रॉय, तिसरा क्रमांक : शितल गिरसे, पुरुष गट : प्रथम क्रमांक : विशाल धोंडीबा, व्दितीय क्रमांक : रमेश चिविलकर, तिसरा क्रमांक : अरुण मोरे यांनी बक्षिस पटकाविले.

सर्व सहभागी स्पर्धकांना टि-शर्ट, सर्टिफिकेट, मेडल, गुडल बॅग देण्यात आले. तसेच स्पर्धेत 21 किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे 10,000, 7500 व 5000 तसेच 10 किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे 7500, 5000 व 3000 आणि 5 किमी श्रेणीतील विजेत्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या रनर्सला अनुक्रमे  5000, 3000 व 2000 अशी रोख बक्षीसे देण्यात आले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani