“खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड” मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद
लोकवार्ता : पिंपरी-चिंचवडमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खडे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे. यासाठी “खड्डे मुक्त पिंपरी-चिंचवड’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली.

याला नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला आहे. या १५ डिसेंबरपर्यंत शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, असा ‘अल्टिमेटम’ भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन कामाला लागले.
यावेळी भोसरी, भोसरी MIDC, इंद्रायणी नगर, J – ब्लॉक, वहिले नगर, डुडूळगाव, ध्यारकर नगर, मोशी – आळंदी रोड, स्पाईन रोड, जाधववाडी या भागातील रस्त्यांचे काम करण्यात आले. एकाच दिवसांत ५० हून अधिक तक्रारी अन् तात्काळ निराकरण करण्यात आले आहे. हि मोहीम सत्कारणी लावल्याबद्दल परिवर्तन हेल्पलाईनच्या स्वयंसेवकांसह सतर्क पिंपरी-चिंचवडकरांचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले.