पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ स्थापना
लोकवार्ता : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात पर्यावरण आणि नदी संवर्धनासाठी ‘नदी सुरक्षा पथकाची’ करण्यात आली आहे. या कामकाजासाठी महापालिकेच्या वतीनं तृतीयपंथीयांचा समावेश असलेल्या नदी सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

भारताला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष झाली या निम्मित भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पालिकेच्या वतीने अनेक कृतिशील उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी समूहाचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
शहरातील नद्या, नाले यांच्या काठावर तसेच रस्त्याच्या कडेला खाजगी जागा मालकांद्वारे अनधिकृत भराव टाकले जात आहेत. तसेच काही भागात मोकळ्या जागेत देखील भराव टाकल्याचे आढळले. या कृतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अशा गोष्टींना आला घालणे व दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आगामी स्वातंत्र्यदिनी आयुक्त राजेश पाटील यांच्या शुभहस्ते ”नदी सुरक्षा पथकाच्या” कार्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. या पथकाच्या तीन तुकड्या निर्माण करण्यात येणार आहेत . हा कार्यक्रम महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
समाजातील वंचित आणि दुरलक्षित घटकांना सामावून घेऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत महापालिकेने तृतीयपंथीयांचा महापालिकेच्या सुरक्षा रक्षक, ग्रीन मार्शल पथकामध्ये समावेश केला आहे. तसेच उद्यान, आरोग्य विभागातील विविध कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शोचालयांचे संचालन करण्यासाठी तृतीयपंथीयांच्या बचत गटांना प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरात वास्तव्य असलेलया आणि 50 वर्ष पूर्ण झालेल्या तृतीयपंथीयांसाठी काही अटी व शर्थींच्या अधीन राहून दरमहा पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या बचत गटांना बळ देण्यासाठी अर्थसहाय्य योजना सुरु करण्यात आली आहे.