लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही

अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी

लोकवार्ता । प्रतिनिधी

उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे मला कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्र्यांने सांगितले असल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. कोल्हापूरात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष केले आहे. इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाल्याने आम्हाला उद्धव ठाकरेंनी आमच्या कानाखाली जरी मारली तरी आम्ही सत्तेमधून बाहेर पडणार नसल्याचे एका मंत्र्याने सांगितल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला असे म्हणाले की, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पनाही नव्हती. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

“महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्टपणे जाणवते. कोणाला कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्यांना लवकर अटक होत नाही, झाली तर दोन दिवसात जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घातले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळांवर टीका
खालच्या कोर्टात दोषारोप सिध्द झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी पेढे वाटत आहेत. ढोल बडवत आहे. याचवेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार विविध चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. “आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version