लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भर उन्हातही बैलगाडा प्रेमींना मोह आवरेना;शर्यती पाहण्यासाठी तुफान गर्दी

-भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला आजपासून सुरुवात.

पिंपरी । लोकवार्ता

भाजपचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या समर्थकांनी या शर्यतीचं आयोजन केलंय. २७ ते 31 मे दरम्यान होणारी ही देशातील सर्वात मोठी शर्यत आहे. भर उन्हातही बैलगाडा प्रेमींना मोह आवरेना. शर्यती पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे.या शर्यतीला संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा मालक आपल्या बैलांसह इथे हजेरी लावणार आहेत.या शर्यतीला आज पासून सुरुवात झाली आहे.बैलगाडा पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमींनी सकाळपासूनच हजेरी लावली आहे.या शर्यतीचा खास आकर्षण म्हणजे ठेवलेले इनाम आहेत.जवळ पास करोडात बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.
अठ्ठावीस लाखांचा एक जेसीबी, एक बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट अन 80 लाखांच्या 114 दुचाकी…. बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना ही वाहन बक्षीस रूपात मिळणार आहेत. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची रक्कम जात असल्याने ही देशातील सर्वात मोठी शर्यत आहे. असा दावा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधवांनी केलाय.

मधल्या काळात बैलगाडा शर्यतींना ब्रेक लागला, त्यामुळं बैलगाडा शौकिनांचा हिरमोड झाला होता. पण न्यायालयीन लढा जिंकला अन् घाटात पुन्हा धुरळा उडू लागला. तेव्हाच देशातील सर्वात मोठ्या शर्यतीची अनुभती द्यायची हे ठरवलं होत. याच संकल्पनेतून भाजपचे आमदार महेश लांडगे आणि समर्थकांनी या जंगी शर्यतीचे आयोजन केलं आहे. तसेच बसण्यासाठी व सर्व बालिगाडा प्रेमींसाठी थंड पेय व खाण्याची सोय केली गेली आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani