मोशी येथील औद्योगिक वसाहतीत स्फोट, 8 जण जखमी
-टाउनशिपमधील मोशी परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट झाला.
मोशी।लोकवार्ता-
जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड टाउनशिपमधील मोशी परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट झाला. यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 17 मार्चरोजी एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये कमी तीव्रतेचा हा स्फोट झाला. औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी काही ठिकाणी साफसफाईचे काम सुरू असताना ही घटना घडली. या प्रकारानंतर लगेचच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत युनिटमध्ये काम करणारे किमान आठ जण भाजले, असे अग्निशामकच्या अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. गंभीर दुखापत नसल्याची माहिती मिळत आहे.

सुदैवाने हा स्फोट झाला, त्यावेळी खूप जास्त कामगार नव्हते. मात्र आठ हा आकडाही जास्तच आहे. या आठ जणांपैकी दोन जण 20 ते 25 टक्के भाजले आहेत. अग्निशामक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी काही साफसफाईचे काम सुरू होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.“युनिट औद्योगिक भंगार हाताळते. वापरलेले तेलाचे बॅरल गरम पाण्यात टाकून ते साफ करत असताना हा अपघात झाला. चुलीवर पाणी तापवले जात होते. बॅरलमधील काही तेल भट्टीच्या ज्वालाच्या संपर्कात आल्याने अचानक आग लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. काही जण भाजले आहेत,” असे भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गवारे यांनी सांगितले.