ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नाममात्र दरात अँजिओग्राफीची सुविधा
या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार केले जातात

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : भोसरी-आळंदी रस्त्यावरील ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध आरोग्य तपासण्या नाममात्र दरात करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या तपासणीमधून वेळीच आजार समजल्यास, त्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

हृदयाबरोबरचब्लडशुगर, युरीन, हिमोग्राम, ईसीजी, २ डीको व इतर चाचण्या करण्याची विशेष सोय भोसरी येथील मल्टीस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी ओम हॉस्पिटल येथे नाममात्र शुल्कात करण्यात आली आहे. अँजिओग्राफी फक्त पाच हजारांत तर आवश्यक असल्यास अँजिओप्लास्टी मोफत केली जाईल, अशी माहिती डॉ अशोक अग्रवाल यांनी दिली.
सर्व आजारांवरचे उपचार दिवसेंदिवस खूपच महाग होत चालले आहे. तसेच कोरोना काळातील परिस्थिती पाहता सर्वांचे जीवन सुरक्षित व्हावे या उद्देशाने समाजिक बांधिलकी जपत भोसरी येथील ओम हॉस्पिटल येथे हा उपक्रम सुरू केला आहे. या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार केले जातात. निरनिराळ्या आजारांसाठी व शस्त्रक्रियांसाठी सर्व प्रकारचे तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स, सक्षम निदान सेवा, गुणवंत स्टाफ, अत्याधुनिक उपकरणाने उपचार होत आहे.
एकाच छताखाली सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. २४ तास तातडीची व तत्पर सेवा, कॅथ लॅब, कार्डीओलॉजी शस्त्रक्रिया, दुर्बीणीद्वारे सर्व शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक व एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक अस्थिरोग शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागाची सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील अनुभवी व नामांकित डॉक्टर उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी ८८८८८२५६०३ वर संपर्क साधा, असे आवाहन डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले आहे. .