फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा भांडाफोड खरच होणार का ?
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नवाब मलिक यांच प्रत्युत्तर.
मुंबई।लोकवार्ता –
राज्यात गेल्या काही दिवसात आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत असून हे प्रकरण आता थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर येऊन पोहचल आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचंही नाव घेतल्याने त्यांनीही आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करण्याचं आव्हान दिलेल्या फडणवीसांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्याबद्दलचा खुलासा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.यावर आता नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय .

या वेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले कि आज फडणवीसांनी काही कागदपत्रं लोकांसमोर ठेवली. ज्यात असा उल्लेख आहे की दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली. आम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाय. आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.
उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन-नवाब मलिक