थेरगावमधील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघाताची भीती
लोकवार्ता : थेरगावमधील डांगे चौकाजवळून थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. चिंचवड – भूमकर चौक रोडवरील डांगे चौकच्या अलीकडे डावीकडे थेरगाव गावठाणकडे जाण्यासाठी रस्ता जातो. या कॉर्नरला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने 8 ते10 फुट, 2 ते ड फुट रुंदी व दोन ते उ फुट खोल खड्डा, पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदला आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेली 20 ते 25 दिवस हा खड्डा खुला आहे. ठेकेदाराची माणसे २ ते ३ दिवसानंतर कधीतरी 5 मिनिटे येतात व लगेच जातात. या खडुयाच्या एका बाजूला फक्त एका प्लॅस्टिक रिबन लावली आहे. रात्रीच्या वेळेस जर दुचाकी चालकाला खड्डा नाही दिसला, तर दुचाकी आत पडून ल्याचा जीव पण जाऊ शकतो. तसेच, कारसुद्धा त्यामध्ये पलटी होऊ शकते.
या खडडयामुळे थेरगाव गावठाणकडे जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधून चालावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून अपघात होऊ दकतो. या खडुयाजवळच पीएमपीएमएल बस थांबा आहे. बसमधून उतरताना व चढताना प्रवाशांना या खड्ड्याचा त्रास होत आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे किंवा वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक नियमनासाठी नसतात.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने येथील काम पूर्ण करून हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांना विचारले असता, ते म्हणाले की, “महानगरपालिकेच्या वतीने थेरगाव गावठाणामध्ये नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ती पाईपलाईन मुख्य पाईपलाईनला जोडण्यासाठी तो खड्डा खोदण्यात आला आहे. आज रात्री पाईपलाईन कनेक्शनचे काम पूर्ण करण्यात येईल व उद्या तो खडा बुजवण्यात येईल.” या खड्यातील मेन पाईपलाईनमधून गळतीमुळे दररोज हजारो लिटर प्यायचे पाणी वाया जात आहे. याविषयी स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.