लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“अखेर पिंपरी चिंचवड महासंघाच्या अध्यक्ष पदी बबन झिंझुर्डे यांची निवड”

-स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांचा ९ मतांनी झाला विजय.

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांची निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी शुक्रवारी दि. २५ फेब्रुवारी निवडणूक झाली होती. मतमोजणी झाल्यानंतर आपला महासंघ पॅनेलचे प्रमुख व अध्यक्षपदाचे उमेदवार अंबर चिंचवडे यांनी अध्यक्षपदाच्या मतांवर आक्षेप नोंदविला होता. यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करुन निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निकाल घोषित करताना सांगितले की, स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे यांना एकूण २५३४ मते मिळाली तर त्यांच्याविरुद्ध उभे राहिलेले अंबर चिंचवडे यांना २५२५ मते मिळाली आहेत. सर्व पंचविस जागांवर विजयी झालेल्या उमेदवारांना गुरुवारी ३ मार्च रोजी निवडणूक कार्यालयात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे १० पैकी ९ पदाधिकारी निवडून आले. तर कार्यकारणी सदस्य पदासाठी एकूण पंधरा जागांपैकी दहा उमेदवार निवडून आले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शंकर आण्णा गावडे पॅनलचे २५ पैकी १९ उमेदवार निवडून आले. सविस्तर निकाल पुढील प्रमाणे उपाध्यक्षपदासाठी मनोज माछरे यांना २६८२ महादेव बो यांना २६०८, सरचिटणीस पदासाठी अभिमान भोसले यांना २६८३ चिटणीस पदासाठी मंगेश कलापुरे यांना २६१५, सहसचिव पदासाठी उमेश बांदल यांना २६६५, कोषापाल पदासाठी नितीन समगिर यांना २६४०, संघटक पदासाठी शुभांगी चव्हाण यांना २७०२ मुख्य संघटक पदासाठी दिगंबर चिंचवडे यांना २६१५ मते मिळाली आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani