अखेर प्रतीक्षा संपली..काही तासांमध्ये लागणार दहावीचा निकाल
शिक्षण मंत्री यांनी ट्विटर द्वारे दिली माहिती.
पुणे । लोकवार्ता
अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. SSC निकाल जाहीर होण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत.मात्र विद्यार्थ्यांच्या मनातील धकधक वाढली आहे.. विद्यार्थ्यांनो तुम्हाला तुमचं अॅडमिट कार्ड जवळच ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. आज दुपारी 1 वाजता रिझल्ट लागणार. निकाल पाहण्यासाठी लागणारी माहिती ही त्या अॅडमिट कार्डमध्ये आहे. राज्यातील मंत्री पत्रकार परिषद घेऊन SSCच्या विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी, टॉपर्स लिस्ट आणि जिल्हानिहाय उत्तीर्णतेची टक्केवारी जाहीर करणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. यावर्षी दहावीच्या परीक्षेला 16,38,964 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 8,89,505 मुले आणि 7,49,458 मुली या परीक्षेसाठी बसल्या होत्या.आता फक्त १ वाजण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

काहीच क्षणात या संकेतस्थळावर तुमचा निकाल पाहता येईल.