लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

उद्योजकांच्या प्रगती आणि विकासासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – चंद्रकांत साळुंखे

लोकवार्ता : पिंपरी चिंचवड मध्ये ऑटोमोबाईल, आयटी, बायोटेक असे अनेक उद्योग झपाट्याने वाढत असून सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगाला (एमएसएमई) बळ देण्यासाठी चेंबर प्रयत्नशील आहे. उद्योजकांच्या प्रगती आणि विकासासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र शासना कडे पाठपुरावा करणार असा दिलासा चेंबरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यावसायिकांना दिला.

एसएमई चेंबर ऑफ इंडिया ‘फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एसएमई इंडस्ट्रीज ॲण्ड एक्सपोर्टर्स समीटचे’ आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क चे डायरेक्टर डॉ राजेंद्र जगदाळे, सुमित ग्रुप इंटरप्राईजेस चे एमडी प्रभाकर साळुंखे, बडवे इंजीनियरिंग ग्रुप चे चेअरमन श्रीकांत बडवे, लार्स आणि टूर्बो कंपनीचे बीजनेस हेड महेश पाठक, एसएमई चे संचालक महेश कुमार साळुंखे, संचालक साक्षी कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दीप्ती पाटील, ब्रँड ॲम्बेसेडर प्रज्ञा पाटील आदी मान्यवर व मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

आर्थिक सल्लागारावर विसंबून न राहता आपला उद्योग यशाच्या शिखरावर घेवून जायचे असल्यास स्वत:ची बँलन्सशीट व बिझनेस प्लान वाचायला व समजायला प्रथम शिकले पाहिजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून नविन प्रोडक्ट डेव्हलप करून त्यांची निर्मिती करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी १० लाखापासून १ करोड रूपयापर्यंत अनुदान देखील देण्यात येते अशी माहिती सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी दिली.

देशातील कोणत्याही रिसर्च लॅब मध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या माध्यमातून आपण आपल्या उत्पादनाची चाचणी करून घेवू शकतो. भारताचा इतर देशांशी असलेल्या द्विपक्षीय, बहुउद्देशीय करार उद्योजकांनी जाणुन घेवून त्याचा फायदा उद्योग वाढीसाठी करावा असे आवाहनही डॉ जगदाळे यांनी केले.

उद्योगाच्या वाढीसाठी नविन आव्हाने नविन संधी शोधण्याची आवश्यकता असून उद्योगांनी स्वत:च्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येवून काम करण्याची गरज आहे असा सल्ला बडवे ग्रुप ऑफ कंपनी अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांनी दिला. स्टार्ट अप ही संकल्पना अतिशय चांगली असून ही संकल्पना व्यवस्थित राबवुन नव उद्योगांना चालना दिल्यास आत्मनिर्भर भारत होण्यास वेळ लागणार नाही. उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून आपला प्रत्येक दिवस हा उद्योगाच्या वाढीसाठी कसा खर्च करता येईल याचा विचार उद्योजकांनी करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

लघु उद्योग हा मोठ्या उद्योगांवर अवलंबून असून मोठ्या उद्योगांनी लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या वाढीसाठी मदत व सहकार्य केले पाहिजे. मोठ्या उद्योगांकडे असलेली टेक्नॉलॉजी, नवे तंत्रज्ञान लघु उद्योगांना उपलब्ध करून दिल्यास देश उत्पादन क्षेत्रात डबल डिजीट ग्रोथ लवकरच साध्य करू शकेल असे प्रतिपादन सुमित ग्रुप ऑफ इंडस्टीजचे चेअरमन प्रभाकर साळुंके यांनी केले. १९९२ साली सुरु केलेला व्यवसाय आज २१ राज्यामध्ये पसरला असून फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात ४२,००० लोकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला असून नविन उद्योगांना येणा-या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा यासाठी त्यांनी यापुढे प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लार्सन आणि टुब्रो ची अगिकृत कंपनी सुफिन L & T च्या माध्यमातून इंजिनीअरिंग प्रोडक्ट साठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलची माहिती बिझनेस हेड भद्रेश पाठक यांनी दिली.

यावेळी बँक ऑफ बरोडा, कोटक बँक, टाटा एआयए, एसबीआय जनरल ईन्शुरन्स, टाटा कॅपिटल, गती लॉजिस्टीक यांच्या पदाधिका-यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani