माजी आमदार विलास लांडे यांची थेट अजित पवार यांच्या सोबत गुप्त बैठक
-अजित पवारांसोबत केला प्रायव्हेट जेट नि प्रवास
-गुप्त बैठकीची सर्वत्र चर्चा सुरु, राजकीय चर्चांना उधाण
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक समोर ठेऊन सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडी व शिवसेना हे एकत्रित लढणार असून काँग्रेस ने एकत्रित लढावे कि स्वतंत्र हे त्यांचे त्यांनी ठरवावे असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार यांनी आतापासून च सहकाऱ्यांसोबत सत्ता प्रस्थापनासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मी एकटा काही करू शकणार नाही असे म्हणून सर्व सहकारी व पदाधिकाऱ्यांना ऊर्जा दिली व निवडणुकीसाठी तय्यारी करण्यास सांगितले.

मध्यंतरीच्या काळात पक्षातील जेष्ठ व माजी आमदार विलास लांडे हे नाराज असल्याचे समोर आले होते. अजित गव्हाणे याना पद मिळणार का?अशी चर्चा सर्वत्र चांगलीच रंगली होती.परंतु आता विलास लांडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त बैठकीच्या चर्चाना उधाण आले आहे .

जेष्ठांची मोट बांधण्याचे काम विलास लांडे यांनी केल्याची चर्चा पक्षांतर्गत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी पक्षांतर्गतच विरोध वाढला होता. त्यांना एकाकी पडण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र विलास लांडे हे गावगुंडी राजकारणात दुसरे शरद पवार मानले जातात. त्यामुळे पालिका निवडणुकीत त्यांना बाजूला करण्याची अमिषा बाळगणाऱ्या पदाधिकाऱ्याना विमानातील गुप्तगू चर्चेमुळे चपराक बसल्याची चर्चा आहे. लांडे यांचे भोसरी, पिंपरी आणि चिंचवडमध्ये असणारे राजकीय संबंध, फोडाफोडीच्या राजकारणात त्यांचा असणारा हातखंडा, २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षांतर्गत विरोध होऊन ही त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे त्यांना पडलेली लक्षणीय मते पाहता शहराच्या राजकारणात त्यांना बाजूला सारून महापालिका निवडणूक सोपी राहणार नाही हे पक्षातील नेत्याना द्यात आहे. त्यामुळे लांडे यांच्या गावगुंडी राजकारणाचा व त्यांचे इतर पक्षात असणाऱ्या संबंधाचा उपयोग महापालिका निवडणुकीसाठी करून घेण्यासाठी त्यांना डावलून पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बाबतीत कोणतीच रिक्स घेणार नाहीत अशी चर्चा असल्याने पुणे व्हाया लातूर व्हाया पुणे या विमान प्रवासाला महत्व प्राप्त झाले आहे.