माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला बैलगाडा शर्यतीचा आनंद
आमदार महेश लांडगे व आयोजकांच केलं कौतुक.
चिखली । लोकवार्ता-
चिखली येथे सुरु असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीच आयोजन आमदार महेश लांडगे व माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे यांनी केले आहे. हि बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध राज्यातून बैलगाडा प्रेमी येत आहेत. त्याच सोबत नेते मंडळींनीही उपस्थिती लावली आहे. आज या शर्यतीचा अनुभव घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती लावली. आमदार महेश लांडगे हे अतिशय चांगल्या पद्धतीचे काम करत आहे या सांगून त्यांचे आणि आयोजकांचे कौतुकही केले.
महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत हे भारताचे सांस्कृतिक वैभव आहे काही विदेशी विचारांच्या प्रवृत्ती या वैभवाला लगाम घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, न्यायालयात आपल्या लढ्याला यश मिळाले. ही बैलगाडा संस्कृती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे. त्यासाठी न्यायालयाच्या नियमांचेही पालन केले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने माजी महापौर राहुल जाधव व माजी महापौर नितीन काळजे यांनी भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानवर भरवली आहे. एकूण पाच दिवस असलेल्या शर्यतीतील तिसऱ्या दिवशी (रविवारी) माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. यावेळी जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले की, मी केंद्रीय पर्यावरण मंत्री असताना देशातील बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत अध्यादेश काढला. मात्र, काही •प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या. पण, आमदार महेश लांडगे आणि बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला. शेतकरी बैल पळवतो, जोपासतो तसे त्याचे आजारपणही पाहतो. वटपूजा जशी होते तशी आम्ही बैलाचीही पुजा आम्ही करतो. तमिळनाडूत जलीकट्टू आणि कर्नाटकात बैलगाडा शर्यतीला कंबाला म्हणतात. तसे महाराष्ट्रातील छकडा हे देशातील ग्रामीण संस्कृतीचे वैभव आहे. हे वैभव टिकवण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचेही कौतूक करतो, असेही जावडेकर म्हणाले.