शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
पिंपरी | लोकवार्ता-
लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील लोकमान्य होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटल यांच्यावतीने चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 100 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबीरामध्ये डॉ. पाचपुते (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सौ. बिजल जैन (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. सौ. अमृता आंबेकर (कान, नाक, घसा तज्ञ), आणि होमिओपॅथिक तज्ञ यांनी रोगांवर मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांची तपसणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आले.
हे शिबिर श्री. निहाल पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. नंदिनी जोशी, डॉ. जयेश क्षीरसागर, आणि लोकमान्य होमिओपॅथिक कर्मचारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.