जनसभेतील मागण्या तात्काळ पूर्ण करा. ऍड. कुणाल तापकीर यांची मागणी
-ऍड.कुणाल तापकीर यांचे ई- क्षेत्रीय कार्यालयाला पत्र
चऱ्होली । लोकवार्ता-
महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत जलदगतीने निर्णय व्हावेत, या हेतूने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यासह ‘जनसंवाद’ या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती.मागील महिन्यात जनसंवादाचे आयोजन केले होते.या जनसंवादादरम्यान अनेक नगरसेवकांनी आपल्या भागातील विषय अधिकाऱ्यांसमोर सादर केले होते.१५ दिवस होऊन गेले तरीही अद्यापही या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने कुणाल तापकीर यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

वाघेश्वर मंदिर येथे शिपाई आणि माळी कामगार मिळावे यासाठी आपल्याला सौ. ज्योति ताई तापकीर यांनी २१/०३/२०२२ रोजी पत्र देऊनही अद्याप त्यावर कसलीही कारवाई झालेली नाही. विविध ठिकाणी केलेल्या स्पीड ब्रेकर त्याच बरोबर गंधर्व पार्क काळजेवाडी येथे ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्यासंबंधी तक्रार दिनांक २८/०३/२०२२ रोजी करूनही अद्याप त्यावर कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये खंत व्यक्त केली जात आहे.
प्रशासकीय काळात कामाची अंबलबजावणी करूनही त्या मागण्या पूर्ण न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तरी वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा शिवसेना उपशहरप्रमुख कुणाल तापकीर यांनी व्यक्त केली आहे.