“G20 परिषदेत मोदींचा VIP याराना”
पंतप्रधान मोदी ‘जी२०’ परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर.
इटली। लोकवार्ता –
२९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोदी इटलीला रवाना झाले.या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही आहेत.मोदी ग्लासगो येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या हवामान परिषदेसाठीही उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ नऊ तासाच्या प्रवासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी२० देशांच्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी रोममध्ये दाखल झाले.मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि भारतीयांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.मोदींनीही परदेशातील या भारतीयांची निराशा केली नाही आणि हसत हसत त्याचं स्वागत स्वीकारलं.

जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य या विषयावरील या परिषदेच्या पहिल्या सत्रात मोदी भाग घेणार आहेत.परिषदस्थळी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी मोदी यांचे स्वागत केले.मोदींना खास गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.मोदींनी २९ तारखेला सर्वात आधी युरोपीयन महासंघाच्या प्रमुखांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.पोप हे रोमन कॅथलिक या जगातील सर्वात मोठ्या धर्मपंथाचे सर्वोच्च धर्मगुरू आहेत. मोदी हे पोप यांची भेट घेणारे भारताचे पाचवे पंतप्रधान आहेत.