लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

Pimpari : गणपती, देवीच्या पर्यावरणपूरक शाडू मूर्ती करा – आयुक्त राजेश पाटील

लोकवार्ता : येत्या गणपतीत आणि नवरात्री उत्सवासाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती करा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

महापालिका पर्यावरण पूरक पाण्यात सहज विरघळणाऱ्या तसेच नैसर्गिक रंगाच्या मूर्ती तयार करण्यावर भर देते. तसेच कोणतेही सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाला हानी होणार नाही याची जबाबदारी प्रशासनावर असते. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रांमध्ये मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार आणि उत्पादक यांना पीओपी पासून मूर्ती बनविण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मूर्तिकारांनी केवळ पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या आणि नैसर्गिक रंग वापरून तसेच पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तींची निर्मिती करा असे आयुक्त राजेश पाटील म्हणाले. तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करणे यासाठी महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादक यांना महापालिका कार्यक्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला परवानगी मिळणार नाही. त्याचबरोबर विनापरवाना अनधिकृतपणे मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यावसायिकावर महापालिकेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मूर्ती तयार करणाऱ्या अथवा विक्री करणाऱ्या कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी याबाबतच्या परवानगीसाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे संपर्क साधून परवानगी घ्यावी. परवान्याची एक प्रत दुकानाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. तसेच महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करताना केवळ शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मूर्तीचा व पर्यावरणपूरक पूजा साहित्याचा वापर करावा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani