लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणांमधील खऱ्या सूत्रधारांना गजाआड करा”

पिंपरी- चिंचवड शहर भाजपाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी ।लोकवार्ता-

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्यातील खरे सूत्रधार मोकाट फिरत आहेत. या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे शहर भाजपाच्या शिष्ट मंडळाने बुधवारी केली. या शिष्टमंडळात महापौर माई ढोरे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, उपमहापौर नानी घुले,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, आरपीआय आठवले गट प्रदेश सरचिटणीस चंद्र्कांता सोनकांबळे, आरपीआय शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे,स्थायी समितीचे माजी सभापती विद्यमान नगरसेवक विलास मडीगेरी, भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांचा समावेश होता.

चिंचवड विधानसभेचे आ. जगतापांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे पिंपळे गुरव येथील “चंद्ररंग डेव्हलपर्स प्रा. लि.” या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बचा वापर करून मंगळवारी (दि. २३ )भ्याड हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली; परंतु, या प्रकरणातील खरे सूत्रधार अजूनही मोकळे फिरत आहेत. या सूत्रधारांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

उगाच षडयंत्र रचू नये
‘शंकर जगताप यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा निंदनीय प्रकार आहे. अशा भ्याड हल्ल्याचे कोणत्याही स्तरातून समर्थन होऊ शकत नाही. राजकारण राजकारणाच्या जागी करावे. उगाच कोणतेही षड्यंत्र रचू नये. अशी माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे आणि भावना आहे. मात्र, जाणीवपूर्वक असे प्रकार शहरात घडवून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रकार केला जात आहे.म्हणून या प्रकाराचा मी तीव्र निषेध व्यक्त करत आहे.याची चौकशी तातडीने आणि सखोल व्हावी अशी मागणी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष आ. महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani