“दारुड्यांना महाराष्ट्र सरकार कडून भेट-आ. महेश लांडगे”
राज्य सरकारने महाराष्ट्रात दारू स्वस्त केली ,पण एसटी कामगारांना न्याय मिळून देता आला नाही-आ. महेश लांडगे
पिंपरी।लोकवार्ता-
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.

राज्य सरकारने विदेशातून इंपोर्ट होणाऱ्या दारूवर लागणारी इंपोर्ट ड्युटी 300% वरून 150% केली. सरळ 50% कमी. या निर्णयामुळे राज्य सरकारचे दरमहा 800 करोड रुपयांचे नुकसान होईल याची कुणीही मागणी केलेली नव्हती. पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स कमी केला तर राज्य सरकार जवळ पैसे नाहीत व राज्य नोटा छापू शकत नाही हे कारण. आता होणारे नुकसान कसे सहन करणार? शेतकऱ्यांची विज माफ करायला पैसा नाही, एसटीच्या कामगारांना द्यायला पैसा नाही.असा टोला भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.