“पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब अथवा अँड्रॉइड मोबाइल उपलब्ध करून द्या”
‘अण्णा बनसोडे’ यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन केले आहे.
पिंपरी ।लोकवार्ता –
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय वापराकरिता टॅब अथवा डिजिटल उपकरणे उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना राष्ट्रवादीचे आमदार आणा बनसोडे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत. २०२० पासून कोरोनाच संसर्गाचा पादुर्भाव वाढल्याने सव शाळा ओंलीने पद्धतीने करण्यात आल्या होत्या. संगणक अथवा डिजिटल उपकरणे हि काळाची गरज असून विद्यार्थी देखील आवडीने आत्मसाद करत आहेत. ऑनलाईन शाळा यांमुळे संगणक वापरण्यात विद्यार्थी अवगत झालेली आहेत.

त्यासाठी नजीकच्या काळात इयत्ता 1 ते 10 वीच्या शाळेतील महापालिका अंतर्गत येणा-या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, •यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांना सन 2021-22 या वर्षात ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण देण्याकरिता अद्यावत तंत्रज्ञान असलेले नवीन प्रचलित आवृत्तीचे टॅब खरेदी करून शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावणे गरजेचे आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणप्रणाली वापरण्याकरिता टॅब उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना आमदार बनसोडे यांनी केली.
त्यासोबतच महापालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घातले असून मोबाइल किंवा इतर डिजिटल साधने घेणे शक्य होत नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांना शालेय वापराकरिता हि साधने उपलब्ध करून द्यावी असे .असे निवेदन अण्णा बनसोडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केले आहे.