खुशखबर !!! मोशीकरांची बससेवा प्रवासाची समस्या कायमची संपली..!
लोकवार्ता : गेल्या अनेक दिवसांपासून भोसरी ते चिखली बससेवे अभावी नागरिकांची गैरसोय होत होती. आता मोशीकरांना या नवीन वर्षात बससेवेचे गिफ्ट मिळाले आहे. त्यामुळे मोशीकरांची समस्या संपली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते निलेश बोराटे यांच्या प्रयत्नांतून भोसरी ते चिखली या मार्गावर पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ही बससेवा मोशी मार्केट, बोऱ्हाडेवाडी, शिवरस्ता लक्ष्मी चौक रिव्हर रेसिडेन्सी या मार्गाने सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि सर्व प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. या बससेवेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.