GOOD NEWS : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या सोसायटी धारकांना अखेर दिलासा; युवा नेते निलेशशेठ बोराटे यांनी लावला तत्काळ प्रश्न मार्गी
लोकवार्ता : मोशी भागाचा विकास व्हावा यासाठी अनेक भागात रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. मोशीतील बालाजी विश्व, के के कायझन तसेच इलेव्हन काऊंटी सोसायटी येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथील सोसायट्यांमधील नागरिक त्रस्त होते. अखेर या प्रश्नावर तोडगा काढत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले आहे.

युवा नेते निलेशशेठ बोराटे यांनी आमदार महेश दादा लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला असता रस्त्याचे काम तसेच साफसफाई करण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मोशी भागात रहदारी वाढली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रस्ते खराब झाले होते. या कारणामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. अखेर या प्रश्नावर तोडगा निघाल्याने परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.