“गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्यांना अटक”
एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर काढला मोर्चा.
मुंबई । लोकवार्ता-
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन आता दिवसेंदिवस चिघळत जाताना दिसत आहेत. एकीकदडे न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहे . तर दुसरीकडे राज्य सरकारने ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील केले आहे. तसेच, राज्य सरकाराने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.यामुळे आंदोलक अजूनच चिघळले आहे. त्यानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना मंत्रालय परिसरातून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपाच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. राज्यभरात एसटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु असून मुंबईत त्यासंदर्भात एसटी कामगारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी गोपिचंद पडळकर आणि किरीट सोमय्यादेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गोपिचंद पडळकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यानंतर किरीट सोमय्या सुद्धा मंत्रालय परिसरात पोहोचले होते. त्यानंतर मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांच्यासह पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे कोणत्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं, तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.