निखील बोऱ्हाडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबीर
लोकवार्ता : वातावरणातील बदल, दिवसेदिवस वाढती थंडी परिणामी रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निखिलदादा बोहाडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन रविवार दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जाधववाडी येथील रामायण मैदानावर करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर सहभागी होणार आहेत. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन निखील बोऱ्हाडे यांनी केले आहे. शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, रेशनकार्ड, मेडिकल रिपोर्ट्स आहेत.
हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रेंक्चर शस्त्रक्रिया, कान, नाक व घसा शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, हार्निया शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, किडनीचे उपचार, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, मुतखडा शस्त्रक्रिया, सांध्याच्या शस्त्रक्रिया, सांध्याच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, दंत चिकित्सा व उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणा, काचबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग उपचार/शस्त्रक्रिया, अशी माहिती निखील बोऱ्हाडे यांनी दिली.
नागरी आरोग्य जपणे ही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपली जबाबदारी आहे. त्यासाठी परिसरातील नागरिकांकरिता एकाच छताखाली विविध आरोग्य तपासणी करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करण्याचा आमचा संकल्प होता. त्यानुसार आम्ही या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
-निखील बोऱ्हाडे