रिव्हर प्लॉगेथॉन ला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
-महापालिका व सामाजिक संस्थांतर्फे आयोजन तब्बल १० टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन.
पिंपरी । लोकवार्ता
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका व विविध सामाजिक संस्थांतर्फे आयोजित रिव्हर प्लॉगेथन मोहिमेत सुमारे दहा टन कचरा मुळा, पवना व इंद्रायणी नदी परिसरातून जमा करून नष्ट करण्यात आला.
चिखली गावठाण इंद्रायणी नदी पात्र परिसरात विकास अनाथ आश्रम व जनवाणी संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबवली. फ क्षेत्रीय कार्यालय सहायक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे यांनी ‘कापडी पिशव्यांचा वापर करावा,’ यासंबंधी गीत सादर केले. जनवाणी संस्थेच्या पर्यवेक्षकांनी स्वच्छतेचा संदेश दिला. ६४० किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला. आरोग्य निरीक्षक राकेश सौदाई, अमोल गोरखे, महेंद्र साबळे, अमित पिसे, विकास अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष विकास साने, जनवाणी संस्था प्रकल्प प्रमुख मंगेश क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते अमृत सोनवणे, दिनेश यादव, जितुभाऊ यादव, विजय काटे, दिनेश कदम, ऋषिकेश सांडभोर, सखाराम धोत्रे, कॉनक्वेस्ट कॉलेजचे प्राचार्य प्रदीप कदम आदी उपस्थित होते.

क क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरातून तीन टन कचरा संकलित केला. भैरवनाथ मंदिर परिसर स्वच्छता मोहीम राबवली. प्लॅस्टिक वापरणार नसल्याबाबत व पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. माजी महापौर राहुल जाधव, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, गणेश मोरे, बी. बी. कांबळे, वैभव कांचन आदी सहभागी झाले. मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी लगत प्लॉगेथॉन मोहीम राबविली. चिखली सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगडे, एसएनबीपी शाळेचे सुमारे तीनशे विद्यार्थी, सिटी प्राइड शाळेचे शिक्षक, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.