गुजरातने EV धोरण जाहीर केले, चार वर्षात गुजरातमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
सध्या गुजरातमध्ये २७८ चार्जिंग स्टेशन सुरू आहेत

लोकवार्ता । प्रतिनिधी
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी २०२१ जाहीर केली. या धोरणानुसार पुढील चार वर्षात गुजरातमध्ये इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे. गुजरातला ईलेक्ट्रॉनिक वाहनांचे हब बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. स्टार्ट अप आणि गुंतवणूकदारांना या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

सध्या गुजरातमध्ये २७८ चार्जिंग स्टेशन सुरू आहेत. आणखी २५० चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा मानस गुजरात सरकारचा आहे. पेट्रोल पंपांनाही चार्जिग स्टेशन सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना RTO नोंदणी फी माफ करण्यात येणार आहे. पुढील ४ वर्षात ५ कोटींचे इंधन या निमित्ताने वाचवण्यावर भर देण्यात येणार आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी घेणाऱ्यांना कमीत कमी २० हजार रुपये अनुदान,
इलेक्ट्रिक तीनचाकी घेणाऱ्यांना कमीत कमी ५० हजार रुपये अनुदान तर,
इलेक्ट्रिक ४ चाकी घेणाऱ्यांना १.५ लाखांचे अनुदान गुजरात सरकार देणार आहे.
गुजरात सरकार नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याच्या बाबतीत प्रोत्साहन म्हणून हे अनुदान देणार आहे. गुजरातला इलेक्ट्रिक वाहनांचे हब बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.