गुजरात विधानसभा निवडणूक: गुजराच्या विजयाचा पिंपरीत आनंदोत्सव
लोकवार्ता : गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विक्रमी विजय मिळवला. सलग सातव्यांदा मतदारांनी भाजपाला संधी दिली. याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मोरवाडी-पिंपरी येथील भाजपाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाबाहेर शहर भाजपाचे पदाधिकारी यांनी पेढे वाटले. तसेच, ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला.

सरचिटणीस विजय फुगे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वात देशाची होणारी गतिमान वाटचाल आणि पक्षाच्या सर्व घटकांच्या मेहनतीला मिळालेली पोहोचपावती म्हणजे गुजरातचा निकाल आहे. गुजरातमध्ये भाजपाला अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल तेथील मतदार, नागरिकांचे आभार मानतो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला निर्विवाद बहुमत दिले. भारताला स्वयंपूर्ण करण्याचा, जगातील सर्वोत्तम देश कऱण्याचा भाजपाचा संकल्प आहे. जनकल्याण योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. याच निर्धारातून गुजरात सरकार आणि पक्ष संघटनेने केलेल्या अविरत कार्यामुळेच हा मोठा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, संदीप कस्पटे, विशाल वाळुंजकर, विनोद तापकीर, किरण पाटील, राजेंद्र ढवळे, वैशाली खाडे, हनुमंत लांडगे, सुधीर चव्हाण, गणेश ढाकणे, दीपक नागरगोजे, हेमंत देवकुळे, प्रसिद्धी प्रमुख संजय पटनी, गणेश नखाते, रवी दाभोळे, किशोर गव्हाणे, मुकेश चुडासमा, कोमल शिंदे, कमलेश भरवाल, कैलास सानप,सुरेश गादीया, दिनकर शिंपी, नितीन अमृतकर, दत्ता यादव, कृष्णा नवले, कृष्णा नवले, संजय परळीकर आदी उपस्थित होते.