6 लाख 14 हजारांचा गुटखा दरोडा विरोधी पथकाने पकडला
लोकवार्ता : प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करताना दरोडा विरोधी पथकाने एक टेम्पो पकडला. त्यात ६ लाख १४ हजारांचा गुटखा आढळला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ५ ) रात्री मेदनकरवाडी, चाकण येथे करण्यात आली. छोटू हरिप्रसाद गुप्ता (वय २०), तपास गिरी रंजन, कैलास पवार, अजयकुमार गुप्ता (सर्व रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छोटू गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमर कदम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या टेम्पोमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करत आहे, अशी माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. मेदनकरवाडी येथील सृष्टी सोसायटीच्या दोजारी असलेल्या मोकळ्या जागेत टेम्पो पार्क केला होता. तिथे पोलिसांनी कारवाई करून पाच लाखाचा टेम्पो आणि त्यातून सहा लाख १४ हजार ८४० रुपयांचा गुटखा जप्त केला. छोटू हा टेम्पो चालक असून त्याने हा गुटखा तपास रंजन आणि केलास पवार यांच्या सांगण्यावरून नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.