H3N2 Virus : पुण्यात आढळले H3N2 व्हायरसचे २२ रुग्ण
लोकवार्ता : पुण्यात एच ३ एन २ (H3N2) व्हायरसचे २२ रुग्ण आढळले आहे. या व्हायरसची लक्षणं ही सामान्य फ्ल्यूसारखीच आहे. त्यामुळे जीवघेणी बाब नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे १९ ते ६० वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत. पुण्यात वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
लक्षणे : ICMR नुसार, काही सामायिक लक्षणांमध्ये ९२% तापाने, ८६% खोकल्यासह, २७% श्वासोच्छवासासह, १६% अस्वस्थतेसह मुले दाखल होत आहेत. तसेच १५ टक्के रुग्णांमध्ये न्युमोनिया ची लक्षणेही आहेत. दाखल होणाऱ्या सुमारे १० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे.
काय काळजी घ्यावी?
साबणाने नियमित हात धुवा.
लक्षणे आढळली तर मास्क वापरा.
खोकताना तसेच शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा.
द्रवरूप पदार्थांचे अधिक सेवन करा.
रोगप्रतिकारकी शक्ती चांगली राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा खा.
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.